मोबाईल, कॉम्पुटर किंवा डिजिटल स्क्रीन आपल्या किंवा मुलांच्याही जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे आणि या डिजिटल स्क्रीन ला टाळता येणं अशक्य आहे. पण त्याचा वापर मात्र नक्की कमी करता येऊ शकतो. स्क्रीन वापरण्याची जर एक शिस्त आपण लावून घेतली तर पालकांना तर उपयोग होईलच आणि मुलांचंही digital wellbeing जपता येईल. म्हणूनच ह्यावेळच्या पालकांची शाळा चा विषय आहे "मुलांच्या स्क्रीनचा प्रश्न कसा सोडवायचा?"
"माझ्या मुलांना अस्खलित इंग्रजी बोलता यायला हवं. कॉलेजमध्ये, पुढे नोकरी करताना इंग्रजी लागणारच!" असं आपल्याला वाटतं. पण मूल कुठल्या भाषेत गप्पा मारतं? त्याला स्वप्नं कुठल्या भाषेत पडतात? ती भाषा म्हणजे त्याची पहिली भाषा; त्याची मातृभाषा. म्हणूनच चिकूपिकू मुलांशी मराठीतून बोलतो.